Like Us

Tuesday, July 6, 2010

जेव्हा पाउस पडतो तुझी आठवण येते                                                                                  

जेव्हा पाउस पडतो
तुझी आठवण येते
मनाच्या कोपर्यात कुठेतरी
एक तार झंकारते

जेव्हा पाउस पडतो
तुझी आठवण येते
इच्छा नसतानाही मी
भूतकाळात हरवते

जेव्हा पाउस पडतो
तुझी आठवण येते
त्या नाजुक क्षणांची कुपी
अगदी अलगद उघडते

जेव्हा पाउस पडतो
तुझी आठवण येते
ढगांसोबतच
मनही भरून येते

जेव्हा पाउस पडतो
तुझी आठवण येते
अश्रुंना वाहायला
तेवढेच पुरेसे असते

पाऊस आणि खिडकी

पाऊस आणि खिडकी                                                                                                      


बालपणातला पाऊस, 
खिडकीतून माझ्या खोलीत डोकावायचा 
आणि हळूच माझ्याशी गुजगोष्टी करून 
मला तो हसवायचा. 
पागोळ्यांचे थेंब बघत मला 
त्याच्यात रमवून टाकायचा. 
कधी कधी तो मला चिंब भिजवायचा 
आणि भिजून झाल्यावर आईच्या कुशीत विसावायला लावायचा.


तारुण्यात हाच पाऊस, 
एका वेगळ्याच रूपात 
पावलांचा आवाज न करता येतो. 
आणि जाताना माझ्या मनाला पावले जोडून जातो 
हाच पाऊस खिडकीपाशी बसल्यावर 
त्याच्या आठवणीत मला रमवतो. 
आणि भविष्यातील अनेक स्वप्नांमध्ये रंग भरायला लावतो.


वार्धक्यात हाच पाऊस 
खिडकीतून बघायचा असतो. 
नातवंडांनी सोडलेल्या होडीबरोबर 
मनाला तरंगत भूतकाळात घेऊनoजातो. 
आठवणींच्या पागोळ्यांत 
मनाला तो चिंब भिजवतो. 
कधी रडवून तर कधी हसवून 
तो ऊन पावसाचा खेळ खेळतो. 


असा हा पाऊस जन्मापासून मरणापर्यंत खिडकीशी नाते जोडतो.

कोसळणारा पाऊस

" कोसळणारा पाऊस "                                                                                                    


कोसळणारा पाऊस
नेहमी मलाच गाठतो
छत्री भिरकावतो अन
सारखा चिखलात लोटतो

थैमान घालणारं त्याचं
आक्राळ विक्राळ रुप
ओलं चिंब होण्यात
मात्र तिला वाटे सुख

भिजलेली गाडी
भिजलेली साडी
भिजलेलं सारं रान
अन भिजलेली झाडी

कडाडणारी विज
तिची लावते ओढ
ओठांवरची चव
ओली चिंब गोड

सोसाट्याचा वारा
भान हरपून नेतो
छ्त्री जाते उडून
मी ओला चिंब होतो

कोसळणारा पाऊस
नेहमी मलाच गाठतो
थेंबा थेंबांनी बोचतो
सारखा आठवणीत लोटतो

Thursday, June 24, 2010

तुझा भास

आठवण

आठवण

निरोप घेताना

आठवण


तू नसताना

भेटीची ओढ

लाट आशेची

आठवण

प्रेम

प्रेम

प्रेम

प्रेम

प्रेम

प्रेम

प्रेम

 

Sunday, June 20, 2010

उगाचच...

उगाचच...
 

एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!
--------------------------- शतानंद.
 

मैत्री2

मैत्री

 
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो 
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर
दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर
अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर
समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर
काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर
फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर
अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर
यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर
मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर
रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर
निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर
वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर
कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर
प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर

"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे

उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे

आयुष्य

आयुष्य



आयुष्य म्हणजे कटकट.. 
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं 
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं
आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं
आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं
पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.
 

Tuesday, June 15, 2010

फक्त तुझया खुषिकरता

फक्त तुझया खुषिकरता

न बोलताही मनातल ओळखणारा तू ,
आज किती वेळा बोलूनही..
न समजल्यासारखा वागू लागलाय..
कारण आता तू खूप बदललाय!!!

मला भेटल्याविणा तुझा दिवस जात नव्हता ,
आज तुझ्या एका भेटीसाठी मी
एक-एक क्षण मोजलाय..
दुरावा मात्र आता रोजचा सोबती झालाय!!!

न चुकता गुलाबाच फूल आणणारा तू ,
हल्ली विसरू लागलाय..
असु देत रे,मी जुन्या गुलाबी आठवनीतच..
नवा सुगंध शोधलाय,जीव माझा रमव्लाय!!!

माझा हात हातात घेण्यासाठी किती बहाने तू करायचास..
आता कुणी बघेल हा बहाणा सांगून ,
तू दूर राहू लागलाय..
का रे इतका परक्यासारखा वागू लागलाय???

पण शेवटी व्हायच ते झालच ,
स्वप्न पुन्हा सार अधुर राहून गेला!!!

माझे अश्रू तर तुला कधी सहन झाले नव्हते ,
आज अश्रू मधे माझया ओल्लिचिम्ब मी..
तू कोरडा ठणथनीत निघून गेलाय..
अगदी कायमचा...मला सोडून..
एकदाही वळून न पाहता!!!

फक्त माझा होतास तू,आज दुसरीचा झालाय ,
पण तक्रार नाही रे राजा काही,तू फक्त खुश राहा..
कारण तुझया खुशितच मी माझा आनंद शोधलाय
फक्त तुझया खुषिकरता बघ नवस मी केलाय
राजा नवस मी केलाय....!!!!
________________________________________________रश्मी सुरडकर

माझी आठवण

माझी आठवण

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

एकदा तरी प्रेम करून बघ…

 एकदा तरी प्रेम करून बघ…
एकदा तरी प्रेम करून बघ…
सगळ काही पाहिल असशीलच मग
एकदा प्रेम करून बघ..

एकटच काय जगायच..?
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..
खुप वेळ असेल तुझ्याकडे..
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..

कविता नुसत्याच नाही सुचणार…
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..
खुप छान वाटत रे..
सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ…

नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..
ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..
नुसतच काय जगायच..
जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..

एक जखम स्वतः करून बघ..
स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ..
नुसत सुखच काय अनुभवायचे..
दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..

विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..
थोड्या जखमा स्वतः करून बघ..
रिकाम काय चालायच..?
आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..

रडत असलेले डोळे लपवत..
एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..
सोपं नसत रे…एकदा रडून बघ..
तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..

सांगण्याचा हेतु एवढाच की..
एकदा का होइना प्रेम करून बघ..

परत ये

परत ये

भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!

कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!

थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये!

तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत.........

मुले .........असतातच असे ....

एकदा एका गावात

Sunday, June 13, 2010

एक क्षन

जीवनात खूप करण्याजोग असत

एक प्रियासी पाहिजे

मला वाटत

काही मानस

मला अजुन भरपूर जगाचय

पाऊस .......तुझया आठवाणीचा

मैत्री

मन उधाण वार्‍याचे

Saturday, June 12, 2010

काळीज रडतंय

....

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी,तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा "

तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"

मग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली,
विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!

आता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..

मग न जाने का , नजर माझीच लागली .....

मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत

त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...

पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच लग्नाची ..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ..
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी..

आज तिच्या प्रेतासोबत
माझंही प्रेत जळतंय...

जीव सोडला आहे....
तरीही काळीज रडतंय...
काळीज रडतंय........

'ती' आणि 'मी'


कॉलेज चा पहिला दिवस...
वर्ग नवीन, मुले नवीन, कट्टा पण नवीनच...
एण्ट्रीलाच 'त्या' ग्रूप ने अडवले.
Raggingच्या नावाखाली झाडं मोजायला लावली...
त्यात, झुडपे आणि रोपटी...
मी नवीन, गोंधळलेला, जरासा घाबरलो.. रडकुंडिला आलो..
त्या ग्रुपमधली 'ती' तेव्हा मदतीला आली..
कानात काहीतरी सांगून पसार झाली..
'मी' मग शेर झालो, 'अकरा हजार पाचशे पंचावन्न' आकडा सांगून निघून गेलो...
'ती' ला शोधता शोधता दोन दिवस गेले आणि परत तिचे दर्शन कट्ट्यावरच झाले...
'ती' हसली, एकटी होती म्हणून 'मी' पण हसलो...
भीड गेली आणि मग आमची दोस्ती झाली.
'ती' Senior असूनही मग आमच्या सुरू झाल्या भेटीगाठी....
पाउस, थंडी उन्हाळा करत, एक वर्ष सरले..
प्रितीला आमच्या तेव्हा मग उधाण आले...
-------------
सरता सरता 'ति'चा कॉलेज चा शेवटचा दिवस आला..
तो गोड करण्यासाठी रडत रडतच आईसक्रीमचा कोन दोघांनी मिळून खाल्ला..
आपली प्रित वाढवायच्या आणाभाका खाउन आम्ही वेगळे झालो..
रोज फोन वर बोलत राहिलो, अधून मधून भेटत राहिलो..
शेवटी 'ति'चे फोन बंद झाले आणि एक दिवस 'ति'च्या लग्नाचे आमंत्रण मिळाले..
खूप वाईट वाटले.. लहान केल्याच्या जाणिवेने तेव्हा देवाला दोष दिले..
दहा दिवसांनी माझा वाढदिवस होता आणि तोच दिवस निमंत्रण-पत्रिकेवरही होता..
'ति'च्या लग्नाला मुद्दाम गेलो.. 'ति'च्या डोळ्यात उगाचच स्वत:ला शोधत बसलो..
'ति'च्या डोळ्यातले भाव पाहून तसाच मग 'मी' माघारी फिरलो...
रूमवर आल्यावर एक बंद पाकीट माझी वाट पाहत होते...
त्यालाही न उघडता तसेच बॅगच्या तळाशी ठेवले...

-----
पाच वर्ष झाली ते पाकीट असेच बंद होते....
पण मनात कुठेतरी कुतूहल होते..
पाच वर्ष जपून ठेवलेले ते पाकीट त्या सकाळी उघडले आणि....
आणि काळीज चरररर झाले...
ते ... ते पाकीट म्हणजे 'ति'चे पत्र होते...
त्यात 'ति'ने माझ्या अबोल प्रश्नांची उत्तरे दिली होती..
वडिलांच्या आग्रहामुळे 'ती' आज माझी नव्हती ...
तरीही 'ति'चे मन माझ्यात गुंतलेले, माझ्यासाठी झुरत होते...
------
'मी' माझ्या प्रपंचात आणि कदाचित 'ती' तिच्या प्रपंचात सुखी असु...
पण कधीतरी अजूनही जुन्या आठवणी जागत असु...
आता तसा आमचा एकमेकांशी काही संबंध नाही उरलाय ..
तरीही कट्ट्याशी असलेला लळा नाही तूटलाय...
आजही 'मी' वाढदिवसाला त्या कट्ट्यवर जातो...
'ति'च्या येण्याची, एक नजर दिसण्याची आस धरून परत झाडं मोजत राहतो...

म्हणून त्या कविता मी परत वाचत नाही...!



निजण्याआधी तुज्यावर कविता करायच्या
हे तर आता रोजचंच झालंय
आणि याची कितीही सवय झाली आहे असं म्हटलं
तरी प्रत्येक वेळेस लिहिताना मला भरून आलंय

मी कविता का लिहितो
हे मला खरंच कळत नाही
कारण जिच्यासाठी मी त्या लिहितो
तिच्यापर्यंत त्या कधीच पोहोचत नाही
आणि मनाची परत घालमेल नको
म्हणून मी ही त्या परत वाचत नाही

तुला खरं वाटणार नाही
पण माझ्या कवितेचा प्रत्येक शब्द माझं काळीज जाळतो
तू माझ्या शब्दाकडे नीट पाहिलंस
तर तुलाही कळेल की
माझा प्रत्येक शब्द मूक अश्रू ढाळतो

माझ्या या कविता
मला कधीही न सुटलेलं कोडं आहे
अफाट दुखः दाबलय मनात
कवितेतून बाहेर आलेलं हे फक्त थोडं आहे

आज वाटलं की अश्रूंच्या शाईनेच कविता लिहावी
तसेही डोळ्यातून ते आज काल आटता-आटत नाही
हे ऐकून अश्रूही आज बोलले
म्हणाले, मनात घुसमट होते म्हणून बाहेर येतो
तर आता तुला तेही पटत नाही



दीपक इंगळे

चाहूल पहिल्या पावसाची

एक दुपार अशीच
सरत्या मे महिन्याची
मी खिडकीपाशी वाचत बसलेले
इतक्यात चाहूल लागली पावसाची

हवेत आलेल्या गारव्याने
उन्हाची काहिली ओसरली
तळपणार्या सूर्याची
कृष्ण्मेघांनी चांगलीच जिरवली

सोसाट्याचा वारा सुटला
बटांशी माझ्या खेळू लागला
त्या अलवार स्पर्शात
त्याचा भास झाला

बघता बघता
जलधारा बरसू लागल्या
टपोर्या थेंबांनी
धरती भिजवू लागल्या

झाडपान रस्त्यासोबत
त्यांनी हवेलाही नाही सोडलं
उरात दडवलेल्या आठवणींना
हलक्या सरींनी जागवल

नकळत हातातल पुस्तक मिटल
मन भूतकाळात हरवल
ओल्या मृदगंधासोबत
आठवणींच अत्तर दरवळल

पहिल्या पावसाच
हेच तर अप्रूप असत
पहिल्या प्रेमाशी त्याच
खूप जवळच नात असत

Friday, June 11, 2010

एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात

तो आणि ती

तो- काय खाऊ या?

ती- काहीही चालेल.

तो- पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊ या?

ती- शी केव्हढी ऑईली असते. मला पिंपल्स येतात.

तो- मग नुस्तंच चहा-ब्रेड सँडविच?

ती- मला इथं मरणाची भूक लागलीये, अन तू मला चहा-ब्रेड देणार?

तो- मग तूच सांग काय खायचं?

ती- काहीही चालेल..!!

..

तो- मग आता आपण काय करू या?

ती- काहीही. तुच ठरव.

तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झलेत?

ती- नको. वेस्ट ऑफ टाईम!

तो- मग बागेत चल, बॅडमिंटन खेळू या.

ती- डोकं फिरलंय का? बाहेर ऊन बघ किती ते..

तो- मग कॉफीशॉपमध्ये तरी जाऊ या.

ती- नको. पुर्ण दिवस झोप येत नाही कॉफी प्याल्यावर.

तो- मग तुच सांग, काय करू या?

ती- काहीही. तुच ठरव..!!

..

तो- जाऊ दे. सरळ घरीच जाऊ या झालं.

ती- काहीही. तुच ठरव.

तो- बसनं जाऊ या?

ती- शी केवढी गर्दी.

तो- ठीके. टॅक्सीने जाऊ या मग.

ती- पैसे जास्त झालेत का? एवढ्याशा अंतरासाठी टॅक्सी?

तो- ठीक. चल मग, चालतच जाऊ.

ती- किती दुष्ट तु? रिकाम्या पोटी मला चालायला लावतोस?

तो- ठीक. मग आधी जेवू या?

ती- व्हाटेव्हर!

तो- काय खाऊ या?

ती- तुच ठरव..!!

मी......

मी तुला कधी न पड्णार स्वप्न आहे
मी कधीही न उलगड्णार तुझ गुपीत आहे!
मी वास्तवतेतही जरी......
मी तुझ्यासाठी न सुट्णार एक कोड आहे!
मी येइन तुला भेटायला........
अचानक नकळ्त.......
एकान्तात असशील न तू?????????
तेव्हाच येईन भेटायला....
मी येईन पहाटेचा गार-गारवा बनुन
अचानक नकळ्त........
स्पर्शुन जाईन तुला
तुझ्या नकळ्त.............
मी येइन.....भर उन्हात
तू चालत असशील न?
भररस्त्यातुन .....झपाझपा
मी येइन तुझी सावली बनुन
मी येईन सान्झवेळी........
मन्द मन्द सुवास बनुन....
तुझ्याच दारी.....तुळ्शीव्रन्दावनापाशी
मी येईन .......तुझ्या खिड्कीतुन डोकावीन
आकशातला चान्दवा बनुन
तुला डोळेभरुन पाहीन.......
मी ??? मी येईन
तुझ्यासाठीच येईन
मी आता मात्र येईन तुला न पड्णार स्वप्न बनुन
कारण मी तुझ गोड गुपीत आहे .. .....
न सुट्णार कोड आहे!

Friday, May 14, 2010

मराठी कविता_"तुटणारा तारा"...

"तुटणारा तारा..."

का कधी कुणासाठी,
हा तारा तुटत असावा ?
माणसे मात्र किती वेडी,
तुटणाऱ्याकडेही इच्छा मागतात..
-
का तुटत असावा तो,
त्याचे कुणीच नसते का ?
समजू शकेल मानवी इच्छा,
इतकी प्रतिभा असते का ?
-
आपल्या इच्छां प्रमाणे,
त्याच्याही इच्छा असतील ना ?
नसतील होऊ शकत पूर्ण,
म्हणून तर तुटत नसेल ना ?
-
मी सुद्धा इतरांसारखाच
म्हटले बघू मागून एखादी इच्छा
खोटे वाटेल तुम्हाला
त्यानेच केली पूर्ण माझी इच्छा..
-
त्या तुटणाऱ्या ताऱ्यामुळेच
ती आज माझी झाली आहे
आजही तो सारखा तुटत असतो
सर्वांच्या इच्छा पूर्ण करत असतो..

-
                                                                             - हरिष मांडवकर
                                                                                ०४-०५-२०१०

मराठी कविता _हिटलरला आमच्या भारतात जन्माला धाडशील का तू

"हिटलरला आमच्या भारतात जन्माला धाडशील का तू"
बुळ बुळ झाली आमची नीती बावचळली नेत्याची मती
"कुणीपण यावे टिकली मरून जावे" अशी झाली आमची गती
एक हळूहळू घुसपेट करतोय दुसरा तर चक्क चुनाच फासतोय
तरीही आमचा बागुल बुवा नुसता संसदेत बाकडेच मोडतोय
ताळ्यावर आण्यासाठी या बुवांना.....
सांग ना रे देवा माझे म्हणणे ऐकशील का तू
हिटलरला आमच्या भारतात जन्माला धाडशील का तू

असंख्य झाले बोंब स्पोट, संसदेवर हि हमले
"अब होगी आर पार कि लढाई " म्हणून फक्त दमले
इंदिरा गांधी हि गेल्या बिचाऱ्या, राजू हि गेले
मारणारे सांड तुरुंगात पितायत मदिरेचे पेले
या सांडांना शिकवाय धडा ......
सांग ना रे देवा माझे म्हणणे ऐकशील का तू
हिटलरला आमच्या भारतात जन्माला धाडशील का तू

मुंबई जळली बंगलोर जळले..पेटले कि हो पुणे
हातात आले किती हि पुरावे तरी राहिले ते उणे
मारणारे कोर्टात बडबडतायत आमचेच हात त्यांना वाचवतायत
Mylord कसाबचे वयच काय आहे ...त्यांच्या वयाकडे पाहून
त्याला फासी ऐवजी ........ मोकळा सांड सोडावा
शंभर नाही दीडशे करोड त्यांच्या पाहूनचारात ओतावा
घरच्या भेदिला शिकवाय धडा .....
सांग ना रे देवा माझे म्हणणे ऐकशील का तू
हिटलरला आमच्या भारतात जन्माला धाडशील का तू

अमेरिकेच्या हातातील बनलीय कटपुतली हि आमची
नाचतेय बोटांच्या तालावर जणु नशा हि RUM ची
शेजारी उठलेत मूळावर घाव टाकतायत रापचिक
स्विस बँकेत नेते टाकतायत काळा मलिदा गपचीप
या चाळेखोराना शिकवण्या धडा ......
सांग ना रे देवा माझे म्हणणे ऐकशील का तू
हिटलरला आमच्या भारतात जन्माला धाडशील का तू
हिटलरला आमच्या भारतात जन्माला धाडशील का तू.....

मराठी कविता _"सखे तू जाता जाता..."

सखे तू जाता जाता...

-
एक क्षण आनंदाचा
माझ्यासाठी सोडून जा
सखे तू जाता जाता
खोटं-खोटं प्रेम करुन जा..
-
आयुष्यभर पुरेल तुला
इतके सुखं घेउन जा
सखे तू जाता जाता
निदान दुखं तरी देऊन जा..
-
कसा जगू इथे एकटा
तुझा विरह पाहून जा
सखे तू जाता जाता
तुझ्या आठवणी देऊन जा..
-
असेच कधीतरी अचानक
पुन्हा एकदा भेटून जा
सखे तू जाता जाता
शेवटचे फूल वाहून जा..

-

मराठी कविता _"बाळकडू........"

बाळकडू.........

आई काबाड कष्ट करायची
डोंगरातून लाकडे तोडून आणायची
छोट्याशा त्यांच्या मोळ्या करून
गावभर हिंडून अनवाणी विकायची

घरी संध्याकाळी थकून यायची
पैक्या बरोबर खाऊहि आणायची
फोड आलेल्या हाताने भरउन
खरबडीत हाताने कुशीत थोपटायची

स्वप्न माझ्यासाठी मोठी पहायची
मायेने गालावर हात फिरवायची
फोडदादा हळूच गालावर फुटून
कष्टाची धार ओठात जायची

बाळकडू पिऊन मी तिला म्हणायचो
आई मी काबाड कष्ट करीन
लाकडाच्या मोळ्या गावभर विकून
बक्कळ पैका कमउन देईन

आईचा एकदम संताप चढला
असा रुद्रावतार आजच पहिला
कवळ्या कानामागे गणपती काढून
शब्द कानाव ओरडून पडला

आरं काबाड कष्ट तर गाढवं करतात
तुला डोकं चालवायचय
खुर्चीवर बसून हजार गाढवांच
काम क्षणात करायचय

माझ्या फोडाचं कष्टामृत पिऊन
शास्त्रज्ञ...नवीन काहीतरी शोधायचय
जगभर नावाची तुझ्या पताका
नाव सोन्यात गोंदवायचय

तुझ्या बुद्धीचा जगभर पसारा
गरिबांना उदाहरण दाखवायचय
अशक्य नाही काहीही जगात
बाळा.........
माझ्या कष्टाचं पांग तुला फेडायचय
माझ्या कष्टाचं पांग तुला फेडायचय

मराठी कविता _ "मृत्यूपत्र..........."

"मृत्यूपत्र..........."

आजपर्यंत मी मानानं जगलो
तुमच्या साठी घामानं भिजलो
म्हताऱ्या हाडाची काड करून
तुमच्या साठी तीळतिळ झीझलो

भाऊभाऊ तुम्ही वैरी झाला
एका काकरी साठी जीवावर उठला
मी मधी बोललो तर..."तुमाला काय कळतंय उगीच मध्ये मध्ये कडमाडू नका "
माझा उपद्रव तुम्हाला झाला

रोजची हमरीतुमरी पाहतोय मी
घरचा तमाशा बघतोय मी
"आजचं कशाला उद्यावर ढकलता"
धाटणी सुनांची आयकतोय मी

सुना रोज डोळं मुरडतात
भाकरी कुत्र्यासम ताटात टाकतात
पाणी माघीतल तर... "कसा गचकेना थेरडा ऐकदाचा"
टोमण्याने पाणी तोंडाव मारतात

कालची माझी बाळं तुम्ही
आजचं जवानीचं वारं तुम्ही
एका जमिनीच्या तुकड्या साठी....
डोकं एकमेकाचं फोडलं तुम्ही

इतकी कारे देवा पोरं बदलतात
हाताचा पाळणा हिश्यात विसरतात
भाऊच वैरी बनून भावाचा...
म्हताऱ्या बापाला लाथेने उडवतात

नकोच झालंय देवा आता.....
म्हताऱ्या बापाचं लाचार जगणं
हृदयभेदी शब्द बाणावर
भीष्म पितामाचं शैयेवर झोपणं

म्हणूनच.....
यांचं यांना देऊन टाकू
लिहायचे ते लिहून टाकू
मृत्यूपत्र एकदाचं खरडून
डोळं कायमचं मिटून टा

मराठी कविता _कडवा जाम

"कडवा जाम"

विसरलीस सये तासंतास फिरायचो आपण विसरून भान
आणि कान तुझे हुरहुरत राहायचे ऐकल्याशिवाय माझी तान
डोक्यामध्ये तुझेच विचार आणि मूखावरती तुझेच नाम
आता पाण्याहुनही प्रिय मजला बाटलीमधला कडवा जाम

कारण काही उमगत नाही का सोडून गेलीस जान
आता आहे जणू काही हिरवाळीशिवाय मोकळे रान
आता होत नाही काहीही जमत नाही कुठलाच काम
आता पाण्याहुनही प्रिय मजला बाटलीमधला कडवा जाम

स्वप्न आता पडत नाही झोपच आता येत नाही विचार दिवस रात्र
विचारात तेच क्षण भूतकाळातील आठवणी आणि त्यतली तू मात्र
सये आठवतो का मी दिलेला रासलीलेतला सावळा शाम
आता पाण्याहुनही प्रिय मजला बाटलीमधला कडवा जाम

एकांती आता गात राहतो गीत एखादे गिटार वर करुण
मुखामध्ये रडका सूर आणि डोळ्यामध्ये ओला वरुण
घर आहे घरस नाही तुजविण कुठले मुल्य न कुठले दाम
आता पाण्याहुनही प्रिय मजला बाटलीमधला कडवा जाम

मराठी कविता _"भूत दिसतेस भूत"

"भूत दिसतेस भूत"

आज होस्टेल मध्ये सकाळी...
थोडी उशिराच उठले
आरशा समोर जांभळी देताना ....
ते विस्कटलेले केस पाहून आली....
तुझी आठवण..
तू सुट्टी संपून....
आर्मी मध्ये माघारी निघाला होतास
केवढे मोठे तुझे ते सौंदर्य .....
चित्त्या हूनही चपळ तू ...
वाघालाही लाजवील अश्या ...
निधड्या छातीचा वीर तू
खांद्यावर कीटब्याग घेऊन निघाला होतास ...
आणि मी... रडत होते..
दादा मला यायचय.... दादा मला यायचय तुझ्या बरोबर म्हणून
तू भारावलेल्या मनाने समजावत होतास मला
पण मी....हट्टी...आयकेल तर हराम
मग तू माझ्या केसांच्या कडे पाहून म्हणालास
ये वेडाबाई ..हे केस बघ विस्कटलेले ...भूत दिसतेस भूत
जा पहिल्यांदा वेणी घालून ये ....
मग न्हेतो तुला माझ्याबरोबर
मी हरकून पळतच घरात गेले.....
आणि तू ....
अचानक कारगिलची चढाई झाली
दुर्गम प्रदेशात दमछाक झाली
करून पराक्रमाची बहादुरी शिकस्त
"टायगर हिल" वीरांच्या रक्तात न्हाली
दादा माझा चीत्त्यासारखा
लढला गड वाघासारखा
चढउन विजयाची स्वर्ण पताका
गड आला पण .....सिह गेला
गावभर दुखाचा वणवा पेटला
दादा भारतमातेच्या झेंड्यात झोपला
आणि मो ओरडतच ......पळत.....
दादा मला यायचंय..... दादा मला यायचंय
एकदमच सभोवती होस्टेल मधल्या मैत्रिणींचा घोळका
"ये वेडाबाई कुठे पळतेस ..हे केस बघ विस्कटलेले ...
भूत दिसतेस भूत"...आणि मी भानावर
मैत्रिणीच्या खांद्यावर डोके ठेऊन
ओरडून ओरडून रडत होते... काश
त्या वेळी हे केस विंचरलेले असते तर....
मीही देशाच्या कामी आले असते..
दादा तुझे सलाम

मराठी कविता_"पुन्हा प्रेम करणार नाही…."

"पुन्हा प्रेम करणार नाही…."

पुन्हा प्रेम करणार नाही.....
भेट आपली शेवट्ची असुन
निरोप घेत आहे…
वरुन शांत असले तरी
ह्र्दयात रडत आहे…
जात आहे सोडुन मला
नाही अडवणार मी तुला…
असशील तिथे सुखात रहा
याच शुभेच्छा तुला…
निरोप तुला देताना
अश्रु माझे वाहतील….
काऴजाच्या तुकड्याना
सोबत वाहुन नेतील…
त्या वाहणारय़ा अश्रुतही
प्रतिबिंब तुझेच असेल…
निट निरखुन पहा त्याला
प्राण मात्र त्यात दिसेल…
वाट आपली दुभंगली आता
परत भेटणे नाही…
प्रवास जरी एक आपला
मार्ग एक होणे नाही…
आठवण तु ठॆवु नकोस
मी कधीच विसरणार नाही…
भेटणे तुझे अशक्य तरी
वाट पाहणे सोड्णार नाही…
जातेस पण जाताना एवदे सांगुण जाशील का?
भेट्लो जर कधी आपण …
ओळख तरी देशील का?
जाता जाता थोडे तरी…
मागे वळुण पाहाशील का?
प्रत्यशात नाही तरी…
डॊळ्य़ानी बोलशील का?
बोलली नाही तु जरी…
नजर तुझी बोलेल का?
गोधंळलेल्या अत:करणाची…
खबर मला सांगेल का?
कुठॆतरी ह्र्दयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्यापुरता तरी तु…
नक्कीच माझी राहशील
नजरेने जरी ओळखलेस तु…
शब्दानीं मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात…
नसती वादळ असणार नाही
नेहमीच पराभव झाला तरी….
हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही….
                                                                                                              संग्राहक- दीपक महाजन

Popular Posts