Like Us

Friday, May 14, 2010

मराठी कविता _"बाळकडू........"

बाळकडू.........

आई काबाड कष्ट करायची
डोंगरातून लाकडे तोडून आणायची
छोट्याशा त्यांच्या मोळ्या करून
गावभर हिंडून अनवाणी विकायची

घरी संध्याकाळी थकून यायची
पैक्या बरोबर खाऊहि आणायची
फोड आलेल्या हाताने भरउन
खरबडीत हाताने कुशीत थोपटायची

स्वप्न माझ्यासाठी मोठी पहायची
मायेने गालावर हात फिरवायची
फोडदादा हळूच गालावर फुटून
कष्टाची धार ओठात जायची

बाळकडू पिऊन मी तिला म्हणायचो
आई मी काबाड कष्ट करीन
लाकडाच्या मोळ्या गावभर विकून
बक्कळ पैका कमउन देईन

आईचा एकदम संताप चढला
असा रुद्रावतार आजच पहिला
कवळ्या कानामागे गणपती काढून
शब्द कानाव ओरडून पडला

आरं काबाड कष्ट तर गाढवं करतात
तुला डोकं चालवायचय
खुर्चीवर बसून हजार गाढवांच
काम क्षणात करायचय

माझ्या फोडाचं कष्टामृत पिऊन
शास्त्रज्ञ...नवीन काहीतरी शोधायचय
जगभर नावाची तुझ्या पताका
नाव सोन्यात गोंदवायचय

तुझ्या बुद्धीचा जगभर पसारा
गरिबांना उदाहरण दाखवायचय
अशक्य नाही काहीही जगात
बाळा.........
माझ्या कष्टाचं पांग तुला फेडायचय
माझ्या कष्टाचं पांग तुला फेडायचय

No comments:

Post a Comment

Popular Posts