Like Us

Wednesday, July 17, 2013

आज माझंच मला कळून चुकलं,

बाबा रिटायर होतोय
आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता नाही आलं.
आज जेवून झाल्यावर
बाबा बोलला,"मी आता रिटायर
होतोय, मला आता नवीन कपडे नको, जे
असेल ते
मी जेवीन, जे असेल ते मी खाईन, जसा ठेवाल
तसा राहीन."
काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं,
आणि टचकन पाणी डोळ्यात यावं, काळीजच
तुटावं,
अगदी तसं झालं.
एवढंच कळलं कि आजवर जे जपलं ते सारंच
फसलं.
का बाबाला वाटलं तो ओझं होईल माझ्यावर ?
मला त्रास होईल जर तो गेला नाही कामावर ?
तो घरात राहिला म्हणून कोणी ऐतखाऊ
म्हणेल,
कि त्याची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्याने दम दिला नाही,"काय हवं ते
करा माझी तब्बेत बरी नाही, मला कामावर
जायला जमणार नाही."
खरंतर हा अधिकार आहे त्याचा सांगण्याचा,
पण
तो काकुळतीला का आला?
ह्या विचारातच माझं मनं खचलं.
नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो,
बाबाच्या कवेत मावेनासा झालो.
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
त्याबरोबर वाढत होता तो अहंकार,
आणि त्याने वाढत
होता तो विसंवाद,
आई जवळची वाटत होती, पण
बाबाशी दुरावा साठत
होता.
मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं,
पण ते
शब्दात सांगताच आलं नाही,
बाबानेही ते दाखवलं असेल, पण दिसण्यात
आलं नाही.
मला लहानाचा मोठा करणारा बाबा, स्वःताच
स्वतःला लहान समजत होता.
मला ओरडणारा - शिकवणारा बाबा, का कुणास
ठाऊक
बोलताना धजत होता.
मनाने कष्ट करायला तयार
असलेल्या बाबाला, शरीर
साथ देत नव्हतं, हे त्या शून्यातून सारं उभं
केलेल्या तपस्वीला, घरात नुसतं बसू देत
नव्हतं. हे
मी नेमकं ओळखलं.
खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून,
सांगायचच
होतं त्याला कि थकलायेस आराम कर, पण
आपला अधिकार नव्हे
सूर्याला सांगायचा कि “मावळ
आता”.
लहानपणीचे हट्ट पुरवणारा बाबा,
मधल्या वयात
अभ्यासासाठी ओरडणारा बाबा,
आणि नंतर चांगलं
वागण्यासाठी कानउघडणी करणारा बाबा,
आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न
ठेवता,
जेव्हा खुर्चीत शांत बसतो, तेव्हा वाटतं
कि काही जणू
आभाळंच खाली झुकलं.
आज माझंच मला कळून चुकलं

Wednesday, December 26, 2012

Heart Touching लव्ह स्टोरी...



अंजली:-"हो विशाल, तू
चांगला मुलगा आहेस,...........
पण
मी राहुल ला सोडू नाही शकत.......
कारण राहुलच्या हृदयाला होल आहे
आणि आता त्याच्याकडे
कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य
मी त्याच्या बरोबर राहावे
अशी आमची दोघांची इच्छा आहे...........
कारण आमचे प्रेम खरे आहे"
विशाल:-"माझे पण तुझ्यावर खरे
प्रेम आहे त्यामुळेतुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड
करावि लागेल"
अंजली :-"राहुल कडे कमी आयुष्य
आहे म्हणून मी त्याला सोडून
तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे
नाव बदनाम नाही करू शकत"
So I am sorry Vishal ........!!
(10 दिवसांनतर)
राहुल :-"अंजली एक
आनंदाची बातमी,.......
मी heart
transplant करून घेतले,.........
दोघेही खूप खुश झाले.......
तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक
पत्र दिले, त्या पत्रात लिहिले होतेकी,
"अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ
शकत नाही......
पण तुझ्यावर प्रेम
करणेही थांबवु शकत
नाही आणि तुझ्या शिवाय जगू
सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहेफक्त
एका छोट्या अपेक्षेने
की मलाही तुझे प्रेम मिळत
राहील"...

Monday, December 24, 2012

मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झाल..,,.


एका गावात एक स्त्री गावा बाहेर आपल्या लहान मुलाला घेऊन एकटीच रहात होती. मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. मुलाचे नाव होते लक्ष्मणदेव. आई धुणी भांडी करून आपला चरितार्थ चालवित होती. मुलगाही आईला कामात मदत करत असे. काम करून तो लांबच्या शाळेत पण जाई.
एक दिवस तो शाळेतून परत आला तर आई झोपलेली होती. तिला खूप ताप भरला होता. लक्ष्मण आईची सेवा करू लागला. बरेच दिवस झाले तरी आईचा ताप उतरेना. खाण बंद झालं. ती खूप अशक्त झाली. लक्ष्मणाला घरची बाहेरची सर्वच कामे करावी लागत. आईची सेवा तो अगदी मन लावून करत असे. तिला दूध गरम करून देणे तिची औषधं वेळच्या वेळी देणे.
एका रात्री आईने लक्ष्मणाला हाक मारली.
'लक्ष्मणा थोडे पाणी देतोस'लक्ष्मण घरात पाणी आणायला गेला. पाणी घेऊन तो परत आला तेवढयात आईला झोप लागली. गुंगीत आई पडून होती. रात्र संपली पहाट झाली. गार वार्‍याच्या झुळुकी बरोबर आईला जाग आली. तिने पाहिले समोर हातात पाण्याचा पेला घेऊन लक्ष्मण उभा होता. आई म्हणाली'लक्ष्मणा अरे तु रात्री झोपलाच नाहीस का ?
वेडया अरे मला उठवायचे नाही कां ?
लक्ष्मण आईच्या हातात पाण्याचा पेला देत म्हणाला,'आई अग माझ्या लहानपणी माझ्यासाठी तु किती रात्री जागुन काढल्यास मग मी एक रात्र तुझ्या करता जागलो तर काय झाल..,,.

✔ ℓιкє ✔ тαg & ✔ ѕнαяє .. ♥
लाइक करा ---> आस मराठीची

Thursday, December 20, 2012

एक छोटीशी प्रेम कथा


होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा...
म्हणतात ना शोदनार्याला देव हि मिळतो.......
तसेच ह्याने तिला शोधले होते.
तीन वर्षाच्या प्रयात्ना नंतर ह्याने तिला मिळवलं होत..
दोगेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे...तीचजरा जास्तच होत.
पण काय करणार दोघांची हि भेट होण शक्य न्हवती.कारण ती गावीआणि हा कायमचा मुंबईला..फोन वर बोलन तसे दररोजचेच.
पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे.........
पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो....
ह्या ला अचानक रक्ताच्या उलट्या होतात..
ह्याला डॉक्टर कडून समजत किमला कर्क रोग झालाय.
आणि माज्या हातात फक्त सहा महिने उरले आहेत.हा तिला समजू देत नाही....
कारण सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो....
आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला पहायचे असते...
तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात..
आणि ह्याला कळून चुकलेले असते कि आपली वेळ जवळ आलीय..
हा मनात विचार करतो कि हिच्या वाढदिवशीआपण हिला शेवटच पहायचं आणि मगच आपण आपले प्राण सोडायचे...
सतत चार दिवस हा तिला त्याचठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट झाली होती...
तिच्या कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे त्याला सांगते...
हा तिला शेवटच विचारतो कि तुला यायचं आहे कि नाही...कसलाही न विचार करता ती त्याला नाही सांगते...
वाढदिवसाचा दिवस उजाडतो....
ह्याच ी वेळ जवळ आलेली असतेह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे असतात...
हा तिला फोन करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...
हि त्याला विचारते काय करतोयस.........
आणि हाशेवटी एवड्च म्हणतो....
आज मी मृत्युच्या दारी उभा आहे ग.........
मरता मरता तुला तुझ्या वाढदिवशी शेवटच पहायची मनापासून खूप इच्छा होती ग...पण तुही नाही म्हणालीस.......
जाता जाता तुझ्या मिठी मध्ये यायचं होत पण तुला भेटायचे न्हवत.......... तेव्हा तर नाही पण मला मेल्यावर तरी मिठीमध्ये घेशील ना....?????
हि विचारते काय झाल आणि फोनकटहोतो.......
हि त्याच्या घरी येते पण वेळनिघून गेलेली असते......
तिला त्याच्या आईकडून समजत.......
हि जेव्हा त्याला आपल्या मिठी मध्ये घेऊन रडत असते तेव्हा त्याचा डावा हात खाली पडतो..त्याच्या हातावरलिहिलेलं असत कि............. ....
ए जाणू नको रडूस ग...
कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले .
मला माफ कर...........
ह्यांनी ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं असत त्याच ठिकाणीहि प्रेम वेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते...
फक्त ह्याच आशेने कि तो कुणाच्या तरी रुपातयेईल आणि तिला मिठीत घेईल...
पण म्हणतातना....
(डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो.पण माथ्या आड गेलेला जिवलग परत कधीच दिसतनाही.........)

हंबरून वासराले चाटती जवा गाय

हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम
शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप
थरथर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय‍ 

_______________कवी नारायण सुर्वे
✔ ℓιкє ✔ тαg & ✔ ѕнαяє .. ♥
आस मराठीची
https://www.facebook.com/aasmarathichi

Wednesday, December 19, 2012

आज
पुन्हा मला तुझी आठवण
झाली
……आज पुन्हा मनात
त्या जुन्या क्षणांची साठवण
झाली
आज
पुन्हा मी काहीतरी विसरलो
…आज
पुन्हा मी तुझ्या विचारांत
हरवलो
आज पुन्हा तुला भेटावसं
वाटलं
…आज पुन्हा तुझ्या बरोबर
बोलावसं वाटलं
आज
पुन्हा चुकल्यासारखा मला जाणवलं
…आज पुन्हा माझं मन
दुखावाल्यासारखं
काहीसं घडलं
आज पुन्हा in-box मधले तुझे
mails वाचले
…आज पुन्हा तुझ्या calls
ची वाट पाहिली
आज पुन्हा मित्रां मध्ये
मी एकटाच राहिलो
…आज पुन्हा मी एकट्यातच
रडलो
आज पुन्हा तू मला समजून न
घेतल्याचा मला वाईट
वाटलं
…आज पुन्हा कोणीच
सोबती नसल्यासारखं
मला वाटलं
आज पुन्हा दिवसभारात
काही नवीन नाही घडलं
आज
पुन्हा मी दिवसाला काल
सारखंच संपवलं …♥ ♥ ♥

♥ Raj ♥

✔ ℓιкє ✔ тαg & ✔ ѕнαяє .. ♥
लाइक करा --- > आस मराठीची

Monday, December 17, 2012

प्रेमात पडला कि असंच होणार...

दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,

स्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापून उरणार,

येता जाता उठता बसता,

फक्त तिचीच आठवण होणार,

तुमचं काय, माझं काय,

प्रेमात पडला कि असंच होणार...

डोळ्यात तिच्या आपल्याला स्वप्नं नवी दिसणार,

तिच्या हास्यातून आपल्यासाठी चांदणे सांडणार,

ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग,

तिच्या पुढे फिका वाटणार,

तुमचं काय, माझं काय,

प्रेमात पडला कि असंच होणार...

तिच्या फोनची आपण दिवसभर वाट पाहणार,

मित्रांसमोर मात्र बेफिकिरी दाखवणार,

न राहवून शेवटी आपणच फोन करणार,

तुमचं काय, माझं काय,

प्रेमात पडला कि असंच होणार...

मन आपला तिच्याने भरून जाणार,

तिच साधपण आपण जपून ठेवणार,

प्रत्येक पहिली गोष्ट तिलाच देणार,

तुमचं काय, माझं काय,

प्रेमात पडला कि असंच होणार...

Popular Posts