Like Us

Friday, May 14, 2010

मराठी कविता _"भूत दिसतेस भूत"

"भूत दिसतेस भूत"

आज होस्टेल मध्ये सकाळी...
थोडी उशिराच उठले
आरशा समोर जांभळी देताना ....
ते विस्कटलेले केस पाहून आली....
तुझी आठवण..
तू सुट्टी संपून....
आर्मी मध्ये माघारी निघाला होतास
केवढे मोठे तुझे ते सौंदर्य .....
चित्त्या हूनही चपळ तू ...
वाघालाही लाजवील अश्या ...
निधड्या छातीचा वीर तू
खांद्यावर कीटब्याग घेऊन निघाला होतास ...
आणि मी... रडत होते..
दादा मला यायचय.... दादा मला यायचय तुझ्या बरोबर म्हणून
तू भारावलेल्या मनाने समजावत होतास मला
पण मी....हट्टी...आयकेल तर हराम
मग तू माझ्या केसांच्या कडे पाहून म्हणालास
ये वेडाबाई ..हे केस बघ विस्कटलेले ...भूत दिसतेस भूत
जा पहिल्यांदा वेणी घालून ये ....
मग न्हेतो तुला माझ्याबरोबर
मी हरकून पळतच घरात गेले.....
आणि तू ....
अचानक कारगिलची चढाई झाली
दुर्गम प्रदेशात दमछाक झाली
करून पराक्रमाची बहादुरी शिकस्त
"टायगर हिल" वीरांच्या रक्तात न्हाली
दादा माझा चीत्त्यासारखा
लढला गड वाघासारखा
चढउन विजयाची स्वर्ण पताका
गड आला पण .....सिह गेला
गावभर दुखाचा वणवा पेटला
दादा भारतमातेच्या झेंड्यात झोपला
आणि मो ओरडतच ......पळत.....
दादा मला यायचंय..... दादा मला यायचंय
एकदमच सभोवती होस्टेल मधल्या मैत्रिणींचा घोळका
"ये वेडाबाई कुठे पळतेस ..हे केस बघ विस्कटलेले ...
भूत दिसतेस भूत"...आणि मी भानावर
मैत्रिणीच्या खांद्यावर डोके ठेऊन
ओरडून ओरडून रडत होते... काश
त्या वेळी हे केस विंचरलेले असते तर....
मीही देशाच्या कामी आले असते..
दादा तुझे सलाम

No comments:

Post a Comment

Popular Posts