Like Us

Saturday, June 12, 2010

'ती' आणि 'मी'


कॉलेज चा पहिला दिवस...
वर्ग नवीन, मुले नवीन, कट्टा पण नवीनच...
एण्ट्रीलाच 'त्या' ग्रूप ने अडवले.
Raggingच्या नावाखाली झाडं मोजायला लावली...
त्यात, झुडपे आणि रोपटी...
मी नवीन, गोंधळलेला, जरासा घाबरलो.. रडकुंडिला आलो..
त्या ग्रुपमधली 'ती' तेव्हा मदतीला आली..
कानात काहीतरी सांगून पसार झाली..
'मी' मग शेर झालो, 'अकरा हजार पाचशे पंचावन्न' आकडा सांगून निघून गेलो...
'ती' ला शोधता शोधता दोन दिवस गेले आणि परत तिचे दर्शन कट्ट्यावरच झाले...
'ती' हसली, एकटी होती म्हणून 'मी' पण हसलो...
भीड गेली आणि मग आमची दोस्ती झाली.
'ती' Senior असूनही मग आमच्या सुरू झाल्या भेटीगाठी....
पाउस, थंडी उन्हाळा करत, एक वर्ष सरले..
प्रितीला आमच्या तेव्हा मग उधाण आले...
-------------
सरता सरता 'ति'चा कॉलेज चा शेवटचा दिवस आला..
तो गोड करण्यासाठी रडत रडतच आईसक्रीमचा कोन दोघांनी मिळून खाल्ला..
आपली प्रित वाढवायच्या आणाभाका खाउन आम्ही वेगळे झालो..
रोज फोन वर बोलत राहिलो, अधून मधून भेटत राहिलो..
शेवटी 'ति'चे फोन बंद झाले आणि एक दिवस 'ति'च्या लग्नाचे आमंत्रण मिळाले..
खूप वाईट वाटले.. लहान केल्याच्या जाणिवेने तेव्हा देवाला दोष दिले..
दहा दिवसांनी माझा वाढदिवस होता आणि तोच दिवस निमंत्रण-पत्रिकेवरही होता..
'ति'च्या लग्नाला मुद्दाम गेलो.. 'ति'च्या डोळ्यात उगाचच स्वत:ला शोधत बसलो..
'ति'च्या डोळ्यातले भाव पाहून तसाच मग 'मी' माघारी फिरलो...
रूमवर आल्यावर एक बंद पाकीट माझी वाट पाहत होते...
त्यालाही न उघडता तसेच बॅगच्या तळाशी ठेवले...

-----
पाच वर्ष झाली ते पाकीट असेच बंद होते....
पण मनात कुठेतरी कुतूहल होते..
पाच वर्ष जपून ठेवलेले ते पाकीट त्या सकाळी उघडले आणि....
आणि काळीज चरररर झाले...
ते ... ते पाकीट म्हणजे 'ति'चे पत्र होते...
त्यात 'ति'ने माझ्या अबोल प्रश्नांची उत्तरे दिली होती..
वडिलांच्या आग्रहामुळे 'ती' आज माझी नव्हती ...
तरीही 'ति'चे मन माझ्यात गुंतलेले, माझ्यासाठी झुरत होते...
------
'मी' माझ्या प्रपंचात आणि कदाचित 'ती' तिच्या प्रपंचात सुखी असु...
पण कधीतरी अजूनही जुन्या आठवणी जागत असु...
आता तसा आमचा एकमेकांशी काही संबंध नाही उरलाय ..
तरीही कट्ट्याशी असलेला लळा नाही तूटलाय...
आजही 'मी' वाढदिवसाला त्या कट्ट्यवर जातो...
'ति'च्या येण्याची, एक नजर दिसण्याची आस धरून परत झाडं मोजत राहतो...

No comments:

Post a Comment

Popular Posts