Like Us

Sunday, December 16, 2012

तु माझ्यासाठी खुप काही आहेस

आयुष्याच्या वळणावर मी एकाकी असताना मला साद घातलीस वयाची अंतरे त्यागून मनाचे भाव फक्त जाणलेस म्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!१!!
ह्या माझ्या रखरखीत जीवनाला तुझ्या भावनिक स्पर्शाने परीस बनविलेसम्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!२!!
तु माझ्यासाठी खुप काही आहेसमनाची उमेद आशेचा किरणहि जाणीव करून दिलीसम्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!३!!
आडवाटेवर पडलेला दगड होते माझे जीवनत्याला मूर्तिमंत आकार दिलासउगाचच त्याला देवाचे नाव दिलेसम्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!४!!
माझ्या आयुष्यात येऊन खास ह्या शब्दाचा नेमका अर्थ मला समजाउन मला खास बनविलेसम्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!५!!
कितीतरी आले अन कितीतरी गेलेत्या येण्यात अन जाण्यात कुठेही तु नव्हतीसती तु फक्त मला तूच दिलीसम्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!६!!
ज्यासाठी पूर्ण आयुष्य वाट पहिलीतुझ्या एका नजरेतून ते सारे काही दाखविलेसम्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!७!!
वर्षानुवर्ष दबलेल्या प्रेरणा आशा आकांक्षा कलापरत जागविल्यास...आणि मला कवी बनविलेस म्हणून तु माझ्यासाठी खास आहेस...!!८!!
 मला माहित नाही हे सर्व काय आहेजाणीव की मैत्री की प्रेम की माया की भावनापण माझ्यासाठी हे सर्व... फक्त तूच आहेस...फक्त तूच आहेस...!!९!!
.... प्राजुन्कुश.... Prajunkush

No comments:

Post a Comment

Popular Posts